Neev 90 for Teens – The Secret of Reaching and Staying at the… (Hindi) (Hindi Edition) A Happy Thoughts Initiative
$45.00
- Description
- Additional information
- Brand
- Reviews (0)
Description
प्रेरणेचा स्रोत महान विभूतींच्या लेखणीतून साकार झालेली महावचनं, सुविचार किंवा म्हणी म्हणजे जणू ज्ञानाचं भांडार. असीमाला सीमित करण्याचा एक सुंदर प्रयास. घागरीमध्ये सागर सामावून घेण्याच्या कलेचं हे एक अनुपम असं उदाहरण. कारण ही वचनं, निराशेनं आणि निरूत्साहानं ग्रासलेल्या जीवनाला आशेच्या किरणांनी उजळून टाकतात. महान विचारवंतांचे अनुभव जेव्हा लेखणीद्वारे कागदावर शब्दरूपात उतरतात तेव्हा ते नवक्रांती घडवू शकतात. त्या अनुभवांच्या अर्कातून समाजाला युगानुयुगे लाभ मिळत असतो, एक नवी दिशा मिळते. या अनुभवसिद्ध विचारांमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली असते. त्याचप्रमाणे प्रस्तुत पुस्तकातील या वचनांमध्येही नवनिर्माणाचं बीज सामावलेलं आहे. याचाच अर्थ, एका विचारातही जग बदलण्याची शक्ती असते. केवळ एका वाक्यात ज्ञानाचं भांडार सामावणारे हे सुुविचार माणसाला समृद्ध करू शकतात, सद्गुणांची खाण बनवू शकतात. सुविचाररूपी आशेचे हे छोटेसे किरण म्हणजे आयुष्याची धनसंपदाच नव्हे का? मग आपण तरी त्यांच्यापासून दूर का राहायचं? चला तर मग, हे भांडार खोलून आपलं जीवन समृद्ध करूया, ज्ञानरूपी सूर्यापर्यंत पोहोचूया…
Additional information
Dimensions | 5 × 5 × 5 cm |
---|
Reviews
There are no reviews yet.